जिल्हा

ट्रॉली कोसळून मिनी ट्रकचालक जखमी

ट्रॉली कोसळून मिनी ट्रकचालक जखमी
ट्रॉली कोसळून मिनी ट्रकचालक जखमी फोटो: ठाणे वैभव

ठाणे: ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ बुधवारी दुपारी मेट्रोचा कॉलम वाहून नेणारी मोठी ट्रॉली एका मिनी ट्रकवर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत मिनी ट्रकचा चालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मेट्रोचा मोठा कॉलम रस्त्यावर कोसळल्याने घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दुपारच्या वेळेतच ही घटना घडल्याने कामानिमित्त ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475